मुंबई : दीपिका पदुकोन लवकरच आता पुन्हा एकदा नव्या सिनेमात रणवीर सिंग सोबत पाहायला मिळणार आहे. रिअल लाईफ जोडी बाजीराव मस्तानीनंतर पुन्हा एकदा मोठी फिल्म करण्यास सज्ज झाले आहेत. संजय लीला भन्सालीच्या पदमावती सिनेमात ही जोडी पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिग्दर्शकांनी मात्र याबाबत अजून काहीही जाहीर केलेलं नाही. पण संगीतकार श्रेयस पुराणिक यांने ट्विटरवर म्हटलं आहे की, दीपिका ही पदमावती सिनेमाचा एक मोठा भाग असणार आहे. प्रियंका की दीपिका या दोघांबाबत भन्साली हे खूप कन्फ्यूसड होते. पण आता त्यांनी दीपिकाला कन्फर्म केलं आहे. 


'पवित्र रिश्ता' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अंकिता लोखंडे देखील या सिनेमामध्ये झळकणार असल्याची चर्चा आहे. अंकिता लोखंडेसाठी ही खूप मोठी संधी आहे. दीपिका असल्यामुळे आता अंकिताला लीड रोल तर मिळणार नाही पण मग दोघांना काय रोल मिळतो हे देखील सिनेचाहत्यांना जाणून घेण्याची इच्छा असेल.