मुंबई : बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोणने केलेल्या ट्विटची सध्या चांगलीच चर्चा रंगतेय. विराटला ट्विट करताना वेलकम टू द फॅमिली असं म्हटलंय. याचा अर्थ विराट बॉलीवूडमध्ये एंट्री करतोय असा नाहीये बरं का. तर टिसॉटचा ब्रँड अॅम्बेसिडेर झाल्याबद्दल दीपिकाने त्याला शुभेच्छा दिल्यात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपिका स्वत: टिसॉटची ब्रँड अॅम्बेसिडेर आहे आणि आता विराटही अॅम्बेसिडेर झाल्याने तिने अशाप्रकारने ट्विट करुन त्याला शभेच्छा दिल्यात. टिसॉट कुटुंबात स्वागत केलेय. मंगळवारी विराटची टिसॉटच्या अॅम्बेसिडेरपदी निवड झाली.