मुंबई : संजय लीला भन्साळींच्या पद्मावती या सिनेमाचं शूट अखेर सुरु झालंय. सिनेमात पद्मावतीच्या भूमिकेत दीपिका पदूकोन दिसणार असून, दीपिका या सिनेमाबद्दल प्रचंड उत्साही आहे.'पद्मावती'सारखा पावरफुल रोल मिळाल्यामुळे मी उत्साही आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राणी पद्मावतीला बरेच लोकं मानतात. या सिनेमाचा भाग असल्याचा मला गर्व आहे. येणारे सहा महिने माझ्यासाठी खुप खडतर असणार आहे.कधी कधी तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी तुम्हाला चांगले सिनेमे मिळत नाही. 


हा सिनेमा मला जास्त कष्ट न करता मिळाला. लक फॅक्टर यालाच म्हणतात, असं दीपिकाने एका कार्यक्रमादरम्यान म्हटलं आहे.