नवी दिल्ली : 'एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटातील 'कौन तुझे' हे गाणं यू-ट्यूबवर रिलीज झालं आहे. यात एमएस धोनी हा आपल्या गर्लफ्रेन्डसोबत फिरताना दिसतोय, धोनी जेव्हा सार्वजनिक ठिकाणी गर्लफ्रेन्डसोबत फिरताना दाखवलाय, त्यावेळी कुणालाही ओळखीचा लागू नये, म्हणून तो सतत हेलमेट घालून फिरताना दिसतोय. या सिनेमात धोनीची भूमिका सुशांतसिंग राजपूतने साकारली आहे.