मुंबई :  बॉलिवूडचा सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा याच्या वाढदिवसाला तीन दिवस झाले असले तरी त्याच्या पार्टीच्या बातम्या आजही चर्चेला जात आहेत. या पार्टीत बॉलिवूडचे अनेक दिग्गज आले होते. त्यात मलायका अरोरा आणि सोनम कपूर देखील होत्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करण जोहरने ही पार्टी आयोजित केली होती. मनीष मल्होत्राचा तो बेस्ट फ्रेंड आहे. या बर्थ डे पार्टीत मलायका अरोरा असं काही वागली, त्यामुळे तिच्या फॅनला धक्काच बसेल. 


एका वेबसाइटने दिलेल्या बातमीनुसार मनीष मल्होत्राच्या पार्टीत मलायकाने जरा जास्त ड्रिंक घेतले होते. त्यानंतर ती 'झोपाळ्या वाचून झुलायला लागली' तिच्या मदतीला सोनम कपूर आली, तिने तिच्याकडे हात दिला पण तिची मदत घेण्याऐवजी ती सोनमवरच भडकली. 


मलायका सोनमला रागात म्हणाली, तू माझ्यापासून दूर राहा, मी स्वतःला सांभाळू शकते. मग असे ऐकल्यावर सोनम दूर गेली. त्यावेळी मनीष आणि करण त्या ठिकाणी आले त्याने मलायकाला आपल्या सोबत नेले.