मुंबई : झी स्टुडिओजची निर्मित आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या सैराट सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार ओपनिंग करत पहिल्या ३ दिवसांत सुमारे १२ कोटी १० लाखांची कमाई केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या महाराष्ट्रभर सैराट सिनेमा गाजतोय. याआधी टाईमपास २, लयभारी आणि नटसम्राट या तिनही सिनेमांनी दहा कोटींचा आकडा पार केला होता. मात्र बॉक्स ऑफिसवर तुफान चालणाऱ्या सैराटने यांचाही विक्रम मोडीत काढला आहे. लोकांचा चित्रपटाला वाढता प्रतिसाद पाहता मल्टिप्लेक्समध्ये शोजची संख्या वाढवण्यात आली आहे. तसेच प्रेक्षकांच्या आग्रहामुळे दोनवेळा झिंगाट हे गाणं लावलं जातंय.


सैराटच्या या यशावर दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नागराज मंजुळे म्हणतात की, "कमाईचं रेकॉर्ड" हा आनंद तर आहेच मात्र शहरापासून गावखेड्यापर्यंत कधीही चित्रपट गृहात न येणारा माणूस सैराट बघतोय याचा आनंद जास्त आहे.
चांगभलं !'


दिले वाऱ्याहाती माप
तोच त्याचा मायबाप !
- संत तुकाराम