किशोर कुमारांबद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?
आज ४ ऑगस्ट म्हणजेच पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, आभिनेता आणि पटकथालेखक किशोर कुमार यांचा वाढदिवस.
मुंबई : आज ४ ऑगस्ट म्हणजेच पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, आभिनेता आणि पटकथालेखक किशोर कुमार यांचा वाढदिवस.
किशोर कुमार यांचे खरे नाव आभासकुमार गांगुली. भारतीय चित्रपटसृष्टी्चा इतिहास लिहायचा झाल्यास किशोरकुमार या नावाशिवाय तो पूर्ण होऊच शकणार नाही. १९६० च्या दशकातील देवआनंद पासून ते १९८० च्या दशकातील अनिल कपूर पर्यंतच्या् अनेक नायकांना यशाची चव चाखविण्यात किशोरदांचा वाटा मोठा आहे. बॉलिवूडला पहिला सूपरस्टार राजेश खन्ना यांच्या रुपाने मिळाला मात्र त्यामागेही किशोरदांचा खास योडली आवाजच होता हे नाकारून चालणार नाही. या हरहुन्नमरी नायक व गायकाच्या गायनात तल्लीन होऊन गाणारा गायक म्हणून किशोर कुमार यांची आबालवृद्धांमध्ये ओळख आहे.
किशोरदांनी गाण्यात जीव ओतून त्यांना विविध रंग चढवून मैफिली सजविल्या आहेत. चित्रपटातही ते चमकले. त्यांनी सुमारे ४०० हून अधिक चित्रपटांत गाणी गायली. ‘चलती का नाम गाडी‘ सारख्या निखळ विनोदी चित्रपटाबरोबरच ’दूर गगन की छाँव में’ सारखे गंभीर चित्रपटही काढले.
किशोरदाचे वडीलबंधू दादा मुनी उर्फ अशोक कुमार व अनुप कुमार यांचे बोट धरून स्वत:चे नशीब अजमावण्यासाठी त्यांनी चित्रपटातील अभिनयातून करिअरचा श्रीगणेशा केला. त्यावेळी चित्रपट सृष्टीत अभिनेत्यामध्ये सर्व गुण पाहिले जात होते. त्यात अभिनेत्याला गायनाच्या कसोटीमधून ही जावे लागत होते.
१९५० मध्ये आभास कुमार आणि कुंजालाल गांगुली यांनी किशोर कुमारला 'मुकद्दर' मध्ये काम दिले. त्यात किशोरदाचा रोल ही तसा चांगलाच होता. मात्र त्यात त्यांना गायनाची संधी मिळाली नाही. त्यानंतर १९५१ मध्ये किशोरदा मन्नाडे यांच्यासह गायलेच. मात्र त्यांना त्यावेळी त्यांनी जागा मिळाली ती पार्श्वगायकांच्यामध्ये, तीही 'आंदोलन' चित्रपटात.
प्रत्येक व्यक्तीच्या मागे मोठा संघर्ष असतो आणि त्या संघर्षाला किशोरदाही कसे अपवाद राहणार. १९५२ ते १९६० दरम्यान किशोरदाने बऱ्याच चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. अधिकार, धोबी डॉक्टर, इल्जाम, मिस माला, नोकरी, पहिली झलक हे चित्रपट तर त्यांनी अवघ्या एका वर्षात म्हणजेच १९५४ मध्ये आटोपल्या. त्यानंतर त्यांनी अभिनयासह आवाजाला दिशा मिळाली. अभिनय व गायन यांचा किशोरदांचा समांतर प्रवास सुरू झाला.
१९५६ मध्ये नऊ चित्रपट करणारा अभिनेता म्हणून त्यांनी त्यांची नवीन ओळख जगाला करून दिली. किशोरदाने आपल्या मिश्किल स्वभावाने चित्रपट सृष्टीत विनोदी भूमिकांचा नवा ट्रेंड आणला. अभिनय करताना गायन आणि संगीताच्या तालावर थिरकणे या त्रिवेणी कलांचा संगम असलेल्या किशोर नी दर्शकांसह श्रोत्यांवर भुरळ घातली. नायकासह गायक यांच्या भूमिकेने तर दर्शकांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर त्यांनी मीना कुमारी, वैजयंती माला, निम्मी, कामिनी कौशल, मधुबाला, नूतन, माला सिन्हा आणि बीना रॉय यांच्यासारख्या नायिकांसोबत चित्रपट केले.
अभिनयासह त्यांनी या चित्रपटामध्ये गायनाची दुहेरी भूमिका केल्याने तर त्यांनी त्यांचे नाव यशाच्या शिखरावर पोहचविले. 'मेरा नाम अब्दुल रहमान', 'नखरे वाली', 'कुंएँ मे कुद जाना यार पर शादी मत करना', 'इना मीना डिका', 'हम तो मोहब्बत करेगा', 'पाच रुपया बारा आणा' अशा एक ना अनेक गीतांमधून किशोरदा आपल्यात आहेत. एके दिवशी अशोक कुमार यांच्या घरी अचानक संगीतकार सचिन देव बर्मन आले. तेव्हा बाथरुममध्ये असलेल्या किशोरदांचे स्वर त्यांच्या कानी पडले.‘कौन गा राहा है?’ असे त्यांनी दादामुनींना विचारले. त्यावर अशोक कुमार यांनी मोठ्या गायकाची ओळख सचिन देव बर्मनला करून दिली. तेव्हा सुप्रसिद्ध संगीतकार सचिनदेव बर्मनने 'बाथरूम सिंगर' किशोरदाला ओळखले. तेव्हापासून सुमधुर गीतांचा झरा किशोरदांच्या कंठातून वाहायला प्रारंभ झाला.
यादगार गीतांना स्वर देणारे किशोर कुमार त्यानंतर चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक तर गीतकार यांच्या भूमिकेत पडद्यावर दिसू लागले. त्यांनी त्याच्या चित्रपटासाठी गीते लिहिली नाही तर त्यांनी संगीतही दिले. 'चलती का नाम गाडी', 'बढती का नाम दाढी', 'जमीन', 'दूर का राही', 'झुमरू' आदी चित्रपट किशोरदांनी दर्शकांना नव्या रूपात दिले. एक चतुर नार, गोरे रंग पे ना इतना गुमान कर, ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा, दिल क्या करे जब किसी को, किसी से प्यार हो जाए, अशा अनेक सदाबहार गितांनी मंत्रमुग्ध करणारे पार्श्वगायक किशोर कुमार यांचे निधन १३ आक्टोबर १९८७ रोजी झाले.