मुंबई : अभिनेत्री आलिया भटला जीवे ठार मारण्याची धमकी देणा-याला ताब्यात घेण्यात आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेश पोलीस एसटीएफ आणि मुंबई क्राईम ब्रांचच्या अधिका-यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केलीय. संदीप साहू असं या 24 वर्षीय व्यक्तीचे नाव असून त्याने त्याने महेश भट यांना फोनवरुन आणि व्हॉट्स अॅप कॉल करुन धमकी दिल्याचे उघड झालंय.


आरोपी संदीप साहू

लवकरच संदीप साहूला मुंबईत आणले जाईल. दिग्दर्शक महेश भट यांना दोन तीनदा फोन करुन त्याने 50 लाखांच्या खंडणीची मागणी केली होती. खंडणी दिली नाही तर आलिया आणि भट यांची पत्नी सोनी राजदान यांनाही गोळ्या झाडण्याची धमकी संदीप साहूने दिली होती. 


संदीप साहूने त्याचा लखनऊ पंजाब नॅशनल बॅकेचा अकाऊंट नंबर देखील महेश भट यांना पाठवला होता. या धमकी प्रकरणानंतर महेश भट यांच्या घराची आणि कुटुंबीयांची सुरक्षा वाढवण्यात आली होती. 


महेश यांनी त्यांच्या धमकीला भीक न घालता मुंबई क्राईम ब्रांचमध्ये या प्रकरणाची तक्रार केली. त्यानंतर मुंबई क्राईम ब्रांचने संदीप शाहूला युपी पोलिसांच्या मदतीने शोधून काढले. या प्रकरणात कुप्रसिद्ध गुंड बबलू श्रीवास्तव याचे नाव आल्याने त्याचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का? त्याचा शोध पोलीस घेत आहेत.