मुंबई : अभिनेता फरहान अख्तर आपल्या पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर आता लवकरच अभिनेत्री कल्की कोचलीन हिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहणार असल्याचं समजतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतंच, काही दिवसांपूर्वी फरहानननं पत्नी अधुना हिच्यासोबतच १६ वर्षांचं नात संपुष्टात आल्याचं जाहीर केलं. 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' या सिनेमात दिसलेली त्याची को-स्टार कल्की कोचलीन हिच्याशी त्याचे नातेसंबंध फारसे चर्चेत राहिले नसले तरी ही दोघं आता लवकरच लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणार असल्याचं समजतंय. 


या दोघांनी 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'च्या सेटवर चांगलाच वेळ व्यतीत केला होता. त्यानंतर मात्र आपल्या बिझी शेड्युलमुळे त्यांना फारसा भेटण्यास वेळ मिळाला नाही. 


पण, पत्नीपासून विभक्त झालेल्यानंतर आता फरहानच्या आयुष्यात पुन्हा एकदा 'प्रेम' येईल अशी आशा करूयात...