मुंबई : ईदच्या दिवशी रिलीज झालेला सिनेमा सुल्तानने ५ दिवसातच २०० कोटींपेक्षा अधिकची कमाई केली आणि ऐवढी कमाई करणारा पहिला सिनेमा ठरला आहे. पण आता त्यांच्यासाठी एक वाईट बातमी येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमान, अनुष्का शर्मा आणि सिनेमाचे दिग्दर्शक ए. अब्बास यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.  मोहम्मद साबिर अंसारी उर्फ साबिर बाबाने आरोप लावले आहे की, सिनेमा त्याच्या जिंवनावरची गोष्ट आहे. सलमान आणि इतर लोकांविरोधात तक्रार दाखल केली आहे.


मुजफ्फरपूरमध्ये राहणाऱ्या मोहम्मद साबीरने म्हटलं की, 'सुल्तान'ची निर्मिती २०१०मध्ये सुरु झाली. दिग्दर्शक ए. अब्बासने 2010 मध्ये बोलावून सिनेमा करण्याचं ठरलं होतं आणि यासाठी त्यांना २० कोटी रॉयलटी देण्याचं ठरलं होतं.'


साबिरचा आरोप आहे की त्यांना रॉयल्टीची रक्कम नाही मिळाली. याबाबत १२ जुलैला सुनावणी होणार आहे.