फिल्म रिव्ह्यू : भावूक करणारा `सरबजीत`
बिग स्क्रिनवर ऐश्वर्या राय बच्चनचा सरबजीत हा सिनेमा आपल्या भेटीला आलाय. उमंग कुमार दिग्दर्शित सरबजीत हा सिनेमा पाकिस्तानमध्ये कैद भारतीय सरबजीत यांच्या आयुष्यावर बेतलेला आहे. अभिनेता रणदीप हुडा, रिचा चाढ्ढा आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या अभिनयानं नटलेला हा सिनेमा...
मुंबई : बिग स्क्रिनवर ऐश्वर्या राय बच्चनचा सरबजीत हा सिनेमा आपल्या भेटीला आलाय. उमंग कुमार दिग्दर्शित सरबजीत हा सिनेमा पाकिस्तानमध्ये कैद भारतीय सरबजीत यांच्या आयुष्यावर बेतलेला आहे. अभिनेता रणदीप हुडा, रिचा चाढ्ढा आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या अभिनयानं नटलेला हा सिनेमा...
कथानक
दिग्दर्शक उमंग कुमार यांनी याआधी मॅरी कॉम हा सिनेमा डिरेक्ट केला होता... मॅरी कॉमप्रमाणेच सरबजीत हा सिनेमा देखील एक बायोपिक आहे... इंडो पाक बॉर्डर स्थित एका गावात राहणाऱ्या सरबजीत आणि त्याच्या परिवाराची ही गोष्ट आहे. आपल्या पत्नी सुखप्रीत कौर आणि बहिण दलबीर कौर यांच्यासोबत तो सुखात राहत असतो. अचानक एका दिवशी सरबजीत गायब होतो, त्याचा काही पत्ता लागत नाही... सरबजीतची बहिण दलबीर त्याला शोधण्याचा भरपूर प्रयत्न करते, पण हाती काहीच लागत नाही. सरबजीतला पाकिस्तान पोलिसांनी कैद केलंय, असं जेव्हा दलबीरला कळतं तेव्हा त्याला सोडवण्यासाठी ती आपलं आख्खं आयुष्य पणाला लावते.
बायोपिक आणि सिनेमॅटीक लिबर्टी
दिग्दर्शक उमंग कुमार यांनी सिनेमाला चांगली ट्रीटमेन्ट दिली आहे. सिनेमा जरी एक बायोपिक असला तरी दिग्दर्शकानं भरपूर सिनेमॅटीक लिबर्टीचा वापर केलाय. रणदीप आणि ऐश्वर्याचा जेलमधला सीन अप्रतिम झालाय... या सिनेमातले अनेक सीन्स तुम्हाला भावूक करतात.
अभिनय
अभिनयाविषयी सांगायचं झालं तर अभिनेता रण्दीप हुडानं सिनेमात जबरदस्त अभिनय केलाय.. त्याची बॉडी लॅन्गवेज, संवाद फेकीची शैली कमाल वाटते. अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चननं आपली भूमिका चोख पार पडली आहे. अभिनेत्री रिचा चड्डानंही छान काम केलंय. तेव्हा या सगळ्या गोष्टी पाहता आम्ही 'सरबजीत' या सिनेमाला देतोय २.५ स्टार्स...