FILM REVIEW : `बाहुबली २`... कमालीची कल्पकता आणि अप्रतिम VFX
ज्या सिनेमाची सगळेच वाट बघत होते, तो सिनेमा अखेर रुपेरी पडद्यावर झळकलाय.
सिनेमा : बाहुबली २ : द कन्क्लुजन'
दिग्दर्शक : एस. एस. राजामौली
संगीत : एम एम किरावनी
एडिटिंग : कोटागिरी वेंकटेश्वरा राव
कलाकार : प्रभास, अनुष्का शेट्टी, राणा डुग्गुबाती, सत्यराज, राम्या कृष्णम
वेळ : 171 मिनिटे
जयंती वाघधरे, झी मीडिया, मुंबई : ज्या सिनेमाची सगळेच वाट बघत होते, तो सिनेमा अखेर रुपेरी पडद्यावर झळकलाय. कटप्पानं बाहुबलीला का मारलं? गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रश्न वायरल झालाय, अखेर या प्रश्नाचं उत्तर आज सगळ्यांना मिळालंय.
'बाहुबली द कन्क्लुजन' हा सिनेमा कसा आहे. काय आहे या सिनेमाची ट्रु स्टोरी त्याच बरोबर सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर ते म्हणजे कटप्पानं बाहुबलीला का मारलं या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळणार आहेत.
तेच ग्रॅनजर, तोच भव्य दिव्यपणा, तो लार्जर दॅन लाईफ अनुभव 'बाहुबली द कन्क्लुजन' या सिनेमातही पहायला मिळतोय. बाहुबली प्रमाणेच 'बाहुबली द कन्क्लुजन'चं दिग्दर्शन केलंय एस एस राजामौली यांनी. या सिनेमाचा हा सिक्वल नसून प्रिक्वल आहे.. बाहुबली या सिनेमाच्या पहिल्या भागात क्लायमॅक्समध्ये जे घडतं, याचाच पुढचा भाग या सिनेमात अधोरेखित करण्यात आलाय.
रेकॉर्डतोड सिनेमा...
2015 साली आलेल्या बाहुबली या सिनेमानं तब्बल 650कोटींचा व्यसाय केला होता. माऊथ पब्लिसीटीच्या जोरावर आणि व्हीएफक्स तंत्रज्ञानाच्या किमयेमुळे बाहुबलीने बॉक्स ऑफिसवर न भूतो न भविष्यती इतिहास रचला... आता 'बाहुबली द कन्क्लुजन' हा सिनेमा हे सगळेच रेकॉर्ड्स मोडणार असल्याची चर्चा रंगतेय. 'बाहुबली द कन्क्लुजन' हा सिनेमा भारतात जवळपास 9000 स्क्रीन्समध्ये प्रदर्शित झालाय.
भारतात एवढ्या मोठ्या स्केलवर प्रदर्शित होणारा बाहुबली हा पहिला सिनेमा ठरणार आहे. सिनेमाचं अॅडव्हान्स बुकिंगही जोरदार आहे, साऊथमध्ये तर 2 मे पर्यंतचे शो हाऊसफुल झालेत. त्यामुळेच हा सिनेमा पहिल्याच दिवशी तब्बल 100 कोटींची व्यवसाय करेल असा अंदाज व्यक्त केला जातोयं.. जर असं झालं तर हा भारतीय सिनेमातील सगळ्यात मोठा सिनेमा ठरेल.
राजामौलींना साकारलेल्या या फॅन्टसी वर्ल्डने सगळ्यांनाच भुरळ घातलीय. सिनेमातील अॅक्शन सीन्सने तर मोठा पडदा अक्षरक्ष: व्यापला... अशी भव्यता आतापर्यंत कधीच रसिकांनी बघितली नसल्यामुळे बाहुबलीला लोकांऩी डोक्यावर घेतलंय.. शिवाय कटप्पाने बाहुबलीला का मारलं? याचं उत्तर मिळवण्यासाठी दुस-या भागापर्यंत राजामौलींनी वाट बघायला लावली..यातचं राजामौलींची कल्पकता दिसते.
प्रेम करावं तर बाहुबली सारखं...
बाहुबली जिथे संपतो तिथून बाहुबली दोनची कथा सुरु होते..प्रेम करावं तर बाहुबली सारखं हे वारंवार हा सिनेमा बघतांना दिसून येतो..पहिल्या भागापेक्षाही सिनेमाचा दुसरा भाग जास्त इंटरेस्टिंग आहे.. बाहुबली, भल्ला, शिवगामी, देवसेना, कटप्पा हे सगळे कॅरेक्टर्स सिनेमाला एका वेगळ्या उंचीवर नेउन ठेवतात.. सिनेमात प्रेम, लालसा,मत्सर, विद्रोह सगळ्या गोष्टींचं मिश्रण दाखविण्यात आलयं..त्याच बरोबर आई आणि मुलाच्या नातेसंबंधांवरही हा सिनेमा अलगदपणे प्रकाश टाकतो..सिनेमाचे व्हीएफएक्स इफेक्ट कमाल झालेत. तर सिनेमाचे अॅक्शनसीन्स अंगावर शहारा आणणारे आहेत..
प्रभास, राणा, अनुष्का, तमन्ना, रमैय्या, सत्यराज सगळ्यांनीच या सिनेमात जबरदस्त अभिनय केलायं..विशेष म्हणजे प्रभास आणि रमैय्या यांचा या सिनेमातील अभिनय लाजवाब झालाय.. सिनेमातील संगीतही सिनेमाला साजेशी आहेत...
हॅटस् ऑफ टू राजामौली
कॅप्टन ऑफ द शिप राजामौलींना यांनायासाठी खऱतर 100 पैकी 100 मार्क द्यायला हवेतं..कारण या फॅन्टसी फिल्मला एवढ्या मोठ्या प्रमाणावर सादर करण्यात त्यांचाच मोठा हात आहे..त्यांच्या कल्पना शक्तीला खऱचं सलाम... हे सगळे फॅक्टर बघता बाहुबली द कन्क्ल्यूजन या सिनेमाला मिळतायत 4 स्टार्स...