मुंबई : 'आयर्न मॅन', 'आयर्न मॅन टू' आणि 'शेफ' यांसारख्या सिनेमांचं दिग्दर्शन करणाऱ्या जॉन फेवरु या आठवड्यात आपल्यासाठी 'द जंगल बुक' हा सिनेमा घेउन आलेत. जॉन स्वत: एक चांगले अभिनेता आणि निर्माताही आहेत. जॉनच्या इतर सिनेमांप्रमाणेच त्यांचा हाही सिनेमा रसिकांचं मनोरंजन करेल का? कसा आहे जंगल बुक? काय़ आहे सिनेमाची ट्रु स्टोरी?  


काय आहे कथानक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'द जंगल बुक' ही कथा आहे मोगलीची... जो जन्मताच जंगलात पोहोचतो... जंगलात पोहोचल्यानंतर तो रोज नव्याने आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत असतो. एकीकडे बलू, बघीरा, अकेला, रक्षा हे सगळे त्याच्या बरोबर असतात, तर दुसरीकडे  जंगलचा राजा शेर खान, मोगलीला जंगलात स्वीकारत नाही. हीच गोष्ट पुढे मनोरंजक पध्दतीने सरकते आणि शेवटपर्यंत रसिकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरते. 


'एनिमेटेड फ्लेवर' सिनेमा 


'द जंगल बुक' हा सिनेमा प्रसिध्द लेखक रुडयार्ड किपलिंग यांच्या कथांवर आधारित आहे. खरंतर या विषयावर ६० च्या दशकात अनेक सिनेमे बनले गेलेत. तसंच दूरदर्शनवर अनेक मालिकाही झाल्या. यावेळेस दिग्दर्शक जॉन फेवरु यांनी जरा हटके पद्धतीनं हा 'ओव्हरऑल एनिमेटेड फ्लेवर' रसिकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे. सिनेमाची सिनेमॅटोग्राफी, अॅनीमेशन आणि वीएफएक्स लाजवाब झालेत. मोठ्या पडद्यावर मोगलीचा हा सफर एकदा तरी अनुभवायला हवा. 


नाना पाटेकर - प्रियांका चोप्राचा आवाज


मोगली ही व्यक्तीरेखा नील सेठी यानं उत्तम पार पाडली आहे. खरंतर सिनेमा पाहताना एकदाही असं वाटत नाही की या सिनेमातले इतर कॅरेक्टर्स अनिमेटेड आहेत. नाना पाटेकर, बेन किंग्स्ले, प्रियांका चोप्रा, ओम पुरी, बिल मरे, इरफान खान आदी दिग्गजांनी आपला आवाज दिलाय. बिग स्क्रिनवर या सगळ्यांचा आवाज ऐकणंच एक धमाल आणि मजेशीर अनुभव आहे. विशेष करुन बघीरासारख्या सीरिअस कॅरेक्टरसाठी ओम पुरीचा आवाज तर दुसरीकडे शेर खानसाठी नाना पाटेकरचा आवाज कमाल वाटतो...


'द जंगल बुक' या सिनेमातले हे सगळे एंटरटेनिंग एलिमेन्ट्स पाहता आम्ही या सिनेमाला देतोय ३.५ स्टार्स...