मुंबई : 'बिग बॉस ९'मधून चर्चेत आलेली अभिनेत्री प्रिया मलिकने 'ब्रा लेस' होऊन सेन्सॉर बोर्डच्या निर्णयाचा निषेध केला. सेन्सार बोर्डाने बार बार देखो सिनेमातील ब्रेसियर दृश्यावर आक्षेप नोंदवला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅटरीना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांची मुख्य भूमिका असलेल्या 'बार बार देखो' चित्रपटातील ब्रेसियरच्या दृश्यावर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला आहे. तसेच सेन्सॉरने ब्रेसियरच्या दृश्याबरोबर सेक्स कॉमिकमधील 'सविता भाभी' या पात्राचा उल्लेख काढून टाकण्याचाही आदेश दिला आहे.


प्रिया मलिकने स्वत: 'ब्रा लेस' होऊन सोशल मीडियावर फोटो अपलोड करुन सेन्सॉरच्या या निर्णयाचा निषेध करताना सिनेमाच्या समर्थनार्थ 'ब्रा लेस' ड्रेस परिधान करुन तिने तिचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केलाय.