मंदिरात गेल्याच्या चर्चांवर सोहाअली खानचं चोख प्रत्युत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खान सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. अमृतसरचं सुवर्णमंदिर आणि गणपती मंडळात जाण्याविषयी सोहाने सोशल मीडियामध्ये उठणाऱ्या प्रश्नाचं चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खान सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. अमृतसरचं सुवर्णमंदिर आणि गणपती मंडळात जाण्याविषयी सोहाने सोशल मीडियामध्ये उठणाऱ्या प्रश्नाचं चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
मंदिरात गेल्यामुळे मी बिगर-मुस्लिम होणार नाही असं अभिनेत्री सोहानं म्हटंल आहे. भारत एक धर्मनिरपेक्ष देश असून, मी मंदिरात गेल्याने माझ्या धर्माला काही नाही होणार असंही तिनं सांगितलं आहे.
सोहाचा एक चित्रपट 31 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार असल्यामुळे ती दर्शनासाठी सुवर्णमंदिर आणि गणपती मंडळात पूजा करण्यासाठी गेली होती.
या चित्रपटाचे कथानक माजी पंतप्रधान इंदिरा गांधीच्या हत्येवर आधारीत आहे. शिवाजी लोटन या चित्रपटाचं निदर्शन करत आहे.
'मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, मी काय करावं हे मला कोणी सांगू नये. मी मंदिरात जाण्याने बिगर-मुस्लिम होईल असं सांगण्याचा अधिकार मी लोकाना दिला नसून, मी काय करावं किंवा करू नये हे सुध्दा कोणी मला सांगू नका'.
प्रत्येक धर्माचा आदर आणि त्या धर्माच्या लोकांचा सन्मान करावा असं यादरम्यान सोहानं म्हणलं आहे.