जन्माष्टमी अभिनेत्री ग्रेसीसाठी का आहे खास
मी जन्माष्टमीच्या शुभ दिवशी इस्कॉन मंदिरात यावी, अशी इच्छा आजही माझे चाहते व्यक्त करतात असं बॉलिवूडची अभिनेत्री ग्रेसी सिंहने म्हटलं आहे.
मुंबई : मी जन्माष्टमीच्या शुभ दिवशी इस्कॉन मंदिरात यावी, अशी इच्छा आजही माझे चाहते व्यक्त करतात असं बॉलिवूडची अभिनेत्री ग्रेसी सिंहने म्हटलं आहे.
'लगान- वन्स अपॉन टाइम इन इंडिया' या सिनेमातील मी केलेल्या गौरीच्या भूमिकेमुळे जन्माष्टमीच्या दिवशी माझे चाहते माझी वाट पाहतात.
लगान सिनेमातील 'राधा कैसे ना जले' या गाण्यात राधाच्या अभिनयामुळे अभिनेत्री ग्रेसी सिंहची ओळख राधा म्हणूनच आहे.
श्रीकृष्णाच्या जन्माचा दिवस हा शुभ असून, या दिवशी मला इस्कॉन मंदिरात जायला आवडतं असं ग्रेसी सिंहने म्हटलं आहे.