`पाठक बाईं`ना द्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
`तुझ्यात जीव रंगला` या मालिकेतून अल्पावधीतच पाठक बाईंनी प्रेक्षकांची मनं जिंकलीत. याच पाठक बाई अर्थातच अक्षया देवधर हिचा आज वाढदिवस आहे.
मुंबई : 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून अल्पावधीतच पाठक बाईंनी प्रेक्षकांची मनं जिंकलीत. याच पाठक बाई अर्थातच अक्षया देवधर हिचा आज वाढदिवस आहे.
'तुझ्यात जीव रंगला'मधील शाळेतील एका शिक्षिका असलेली अंजली आणि पैलवान असलेला राणा दा यांच्या जोडीनं प्रेक्षकांना भुरळ घातलीय.
मूळची पुण्याची असलेल्या अक्षयानं थिएटर ग्रुप असलेल्या 'नाटक कंपनी'तून आपल्या करिअरला सुरुवात केलीय. बिनकामाचे संवाद, दर्शन, संगीत मानापमान या नाटकांतूनही अभिनय क्षेत्रात आपला ठसा उमटवलाय.
अक्षयाला आज वाढदिवसानिमित्तानं सोशल मीडियातून तिचे मित्र - मैत्रिणी आणि चाहत्यांकड़ून अनेक शुभेच्छा मिळताना दिसतायत.
मग, आजच्या बर्थ डे क्वीनला तुम्हीही द्या शुभेच्छा... काय... चालतंय की...