नवी दिल्ली : क्रिकेटर युवराज सिंगशी लग्न झाल्यानंतर हेझल कीचचे नाव बदलले आहे. आता ती गुरुबसंत कौर झालीये. युवराजच्या आईने हे नाव सुचवल्याचा खुलासा त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फतेहगड स्थित गुरुद्वारमध्ये युवराज आणि हेझल लग्नबंधनात अडकले. शीख परंपरेनुसार हा विवाह पार पडला. या सोहळ्यास युवराज आणि हेझलचे नातेवाईक आणि मित्रपरिवार उपस्थित होता. 


आज हिंदू परंपरेनुसार होणार विवाह


युवराज आणि हेझलचा आज हिंदू परंपरेनुसार विवाह होणार आहे. गोव्यात हा सोहळा पार पडतोय. त्यानंतर दिल्लीत रिसेप्शन होणार आहे. या सोहळ्यात पंतप्रधान मोदींसह अनेक बडी मंडळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.