एका इव्हेंटसाठी अभिनेत्री घेतात एवढं मानधन
आयफामध्ये परफॉर्म करण्यासाठी प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोणनं चार मिनिटांच्या परफॉर्मन्ससाठी 1 कोटी 30 लाख रुपये घेतल्याची चर्चा आहे.
मुंबई : आयफामध्ये परफॉर्म करण्यासाठी प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोणनं चार मिनिटांच्या परफॉर्मन्ससाठी 1 कोटी 30 लाख रुपये घेतल्याची चर्चा आहे. आतापर्यंत कुठल्याही पुरस्कार सोहळ्यात कोणत्या अभिनेत्रीने परफॉमन्ससाठी घेतलेली ही सगळ्यात मोठी रक्कम आहे.
एरव्ही 70 ते 80 लाख रुपये मानधन घेणा-या या अभिनेत्रींनी अचानक एवढी मोठी रक्कम घेतल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. कतरिना, विद्या, कंगना या अभिनेत्रीही या रेस मध्ये मागे नाहीत. आतापर्यंत कतरिनाच्या नावावर सर्वाधिक रक्कम घेण्याचा रेकॉर्ड होता..कतरिनाने 2013मध्ये स्टारडस्ट अवॉर्डसाठी 90 लाख रुपये घेतले होते.
कतरिना कैफ- 80 ते 90 लाख
कंगना रणावत - 65 ते 85 लाख
विद्या बालन- 60 ते 70 लाख
अनुष्का शर्मा- 65 ते 85 लाख
करिना कपूर- 80 ते 85 लाख
माधुरी दिक्षित- 75 ते 85 लाख
बिपाशा बसू- 60 ते 70 लाख
जॅकलिन फर्नांडिस- सुमारे 50 लाख