स्टायलिश लूकसाठी प्रियांकाचा महिन्याचा खर्च ठाऊक आहे का?
सध्या हॉलिवूड गाजवण्यात दंग असणारी देसी गर्ल प्रियांका चोप्रा आपल्या लूकवर जास्त लक्ष देताना दिसतेय.
मुंबई : सध्या हॉलिवूड गाजवण्यात दंग असणारी देसी गर्ल प्रियांका चोप्रा आपल्या लूकवर जास्त लक्ष देताना दिसतेय.
'आंतरराष्ट्रीय स्तरावरची स्टार' अशी ख्याती मिळवण्यात प्रियांका यशस्वी ठरलीय. बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्येही आपली छाप सोडण्यासाठी प्रियांकाला तिच्या लूकवर नेहमीच लक्ष ठेवावं लागतं. यासाठी ती रग्गड पैसेही खर्च करतेय.
मीडिया रिपोर्टनुसार, प्रियांका आपल्या चेहऱ्यासाठी आणि केसांची काळजी घेण्यासाठी महिन्याला ८०,००० रुपये खर्च करते.
स्किनकेअर प्रोडक्टस् उदाहरणार्थ क्लीन्जर, स्किन क्रीम अशा गोष्टींसाठी ती जवळपास ४२,००० रुपये खर्च करते. तर केसांसाठी शॅम्पू, कंडीशनर, सिनम यांसारख्या वस्तूंसाठी तिला प्रती महिना ३८,४०० रुपये खर्च करावे लागतात.
प्रियांका सध्या 'क्वांटिको'च्या दुसऱ्या सीझनच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तर लवकरच ती 'बेवॉच' या हॉलिवूड चित्रपटातही दिसणार आहे. हा सिनेमा येत्या वर्षी १९ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. हा प्रियांकाचा पहिलाच हॉलिवूड सिनेमा आहे.