मुंबई : बॉलीवूड सेलिब्रिटी चित्रपटांबरोबरच वेगवेगळ्या समारंभांमध्ये तसंच अनेकांच्या लग्नांना उपस्थिती लावतात. एवढच नाही तर या सेलिब्रिटी अशा समारंभांमध्ये जाण्यासाठी आणि तिकडे परफॉर्म करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मानधन घेतात. काही सेलिब्रिटी तर यासाठी कोट्यवधी रुपये घेतात. बॉलीवूडच्या या टॉप टेन सेलिब्रिटींवर एक नजर टाकूयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहरुख खान


लग्नात आणि पार्टीत परफॉर्म करण्यासाठी शाहरुख घेतो जवळपास 3 कोटी रुपये 


अक्षय कुमार


एखाद्या कार्यक्रमाला फक्त हजेरी लावण्यासाठी बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार 30 ते 35 लाख रुपये घेतो. 


अनुष्का शर्मा 


कोणताही कार्यक्रम किंवा लग्नामध्ये परफॉर्म करण्यासाठी अनुष्का शर्मा 70 लाख रुपये घेत असल्याचं बोललं जातं. 


हृतिक रोशन


अभिनयाबरोबरच डान्समुळे हृतिक रोशनचे असंख्य चाहते आहेत. हाच हृतिक रोशन समारंभामध्ये नाचण्यासाठी 2 कोटी रुपये घेत असल्याचा चर्चा आहेत. 


करिना कपूर 


करिना कपूरला कोणत्याही समारंभामध्ये डान्स करायला आवडत नसलं तरी ती चित्रपट करण्यासाठी 8 कोटी रुपये घेत असल्याचं बोललं जातं. 


कतरिना कैफ


लग्नामध्ये परफॉर्म करण्यासाठी कतरिना कैफ 2.5 कोटी रुपये घेते. 


प्रियांका चोप्रा 


लग्न समारंभाला उपस्थित राहण्यासाठी प्रियांका 2.5 कोटी रुपये मानधन घेते. 


रणवीर सिंग


बॉलीवूडचा बाजीराव रणवीर सिंग लग्न समारंभात परफॉर्म करण्यासाठी जवळपास एक कोटी रुपये घेतो. 


बिपाशा बासू


नुकतंच लग्न झालेली बिपाशा बासू लग्नसमारंभात परफॉर्म करण्यासाठी 25 लाख रुपये मानधन घेते. 


सोनाक्षी सिन्हा


बिपाशा प्रमाणेच दबंग सोनाक्षी सिन्हाही कार्यक्रमांमध्ये परफॉर्म करण्यासाठी 25 लाख रुपये घेते.