सैराटमधील ते आगीचे दृश्य कसे चित्रीत करण्यात आले होते?
नागराज मंजुळे दिग्दर्शित `सैराट` या चित्रपटाचे पहिले पोस्टर आले होते तेव्हापासूनच सैराट कसा असणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली होती. अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांनी चित्रपटावर भरभरुन प्रेम केले. तसेच अद्यापही करतायत. ५५ कोटींची बक्कळ कमाई करत या चित्रपटाने नवा इतिहास रचलाय.
मुंबई : नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' या चित्रपटाचे पहिले पोस्टर आले होते तेव्हापासूनच सैराट कसा असणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली होती. अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांनी चित्रपटावर भरभरुन प्रेम केले. तसेच अद्यापही करतायत. ५५ कोटींची बक्कळ कमाई करत या चित्रपटाने नवा इतिहास रचलाय.
चित्रपटाच्या पहिल्या टीझरमध्ये आगीच्या बाजूने चार जण पळत असल्याचे दाखवण्यात आले होते. चित्रपटातील या दृश्यात आगीच्या बाजूने परश्या आणि आर्ची पुढे पळत आहेत तर सल्या आणि बाळ्या मागून पळताना दिसतायत. मात्र हा सीन कसा शूट झाला तुम्हाला माहीत आहे का?
या सीनच्या शूटिंगसाठी तब्बल पाच एकर जमिनीवरील उसाचे पाचट जाळण्यात आले होते. तसेच दोन वेळा आग लावण्यात आली होती. त्यानंतर याचे चित्रण करण्यात आले होते.
या संपूर्ण चित्रपटाचे चित्रीकरण सोलापूरच्या विविध शहरांमध्ये झाले. जेऊर, केम, कंदर, वांगी, पोफळज, चिखलठाण, कर्जत, मांजरगाव या ठिकाणी झाले.