मुंबई : हृतिक रोशनला मोहनजो दारो या चित्रपटाकडून मोठया अपेक्षा होत्या. पण अक्षय कुमारच्या रुस्तमसमोर मोहनजो दारोला फारशी कमाई करता आली नाही. गुंतवणूक केलेल्याच्या अर्धी रक्कमही मोहनजो दारोला कमावता आली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोहनजो दारोच्या या अपयशामुळे हृतिक रोशन भडकला असल्याचं बोललं जात आहे. चित्रपटाच्या अपयशाला आशुतोष गोवारिकर जबाबदार असल्याचं हृतिकला वाटत आहे, अशाही चर्चा आहेत. 


हृतिकनं यावरून आशुतोषला मेसेज केला. या मेसेजला आशुतोषनंही प्रत्युत्तर दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मोहनजो दारोच्या अपयशामुळे हृतिक आणि आशुतोषचे संबंध मात्र ताणले गेले आहेत.