मुंबई : बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन याने काही दिवसांपूर्वीच संजय गुप्ता यांचा एक सिनेमा साईन केला आहे. पण या सिनेमावर सुधांशू पांडे यांनी आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी म्हटलं आहे की या सिनेमाची कथा माझी आहे. या सिनेमावर काम सुरू झालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमान खान याचा देखील या सिनेमाशी संबंध येणार आहे. कारण ९० च्या दशकामध्ये बुलंद या नावाचा एक सिनेमा येणार होता. या सिनेमाचं ८० टक्के शुटींग देखील पूर्ण झालं होतं. सोमा अली या सलमानच्या गर्लफ्रेंडने त्यावेळेस सलमानवर आरोप केले होते की त्याने रागात तिला कोलाची बॉटल मारून फेकली होती. त्यानतंर मग हा सिनेमा रिलीज झालाच नाही.


हृतिक रोशन याने साईन केलेल्या काबील या सिनेमाची कथा देखील या सिनेमासारखी आहे असं म्हटलं जातंय. त्यामुळे सलमान आणि हृतिक यांच्यामध्ये सिनेमा मिळवण्यावरून चांगलीच चुरस पहायला मिळतेय. 


साऊथ सुपरस्टार महेश बाबू स्टारर हे एका सिनेमाचा रिमेक करणार होते त्यासाठी आधी सलमानचं नाव चर्चेत होतं पण आता हृतिकचं नाव फायनल झाल्याची चर्चा आहे. 


कबीर खान बजरंगी भाईजान नंतर पुन्हा एकदा सलमान खान सोबत काम करेल अशी चर्चा होती पण कबीर खान पुढचा सिनेमा हृतिक सोबत करणार आहे. बजरंगी भाईजानसाठी देखील हृतिकचं नाव चर्चेत होतं.