मुंबई : कंगणा राणावत बरोबर काम करायला आवडेल असं म्हणणारा इरफान खान आता दीपिकाच्या प्रेमात पडलाय. दीपिका ही आपल्याला आजपर्यंत सर्वात जास्त आवडलेली हिरोईन असल्याचं इरफानने म्हटलंय. 


दीपिका आणि इरफानने याआधीही एकत्र काम केलंय. मात्र यापुढेही दीपिकासोबत असाच एखादा हटके प्रोजेक्ट करायला आपल्याला नक्कीच आवडेल, असंही इरफानला मनोमन वाटू लागलंय. दीपिकाच्या हॉलिवूडमधील कामाचंही इरफानने खास कौतुक केलंय.