मुंबई : बॉलीवूड अभिनेता इरफान खान याने काही दिवसांपूर्वी बकऱ्यांची कत्तल प्रकरणात विधान करुन नवा वाद निर्माण केला होता. बकऱ्यांची केली जाणारी कत्तल म्हणजे कुर्बानी नसल्याचे विधान त्याने केले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इरफानच्या या विधानानंतर मुस्लिम धर्मगुरुंनी त्याच्यावर जोरदार टीका केली होती. स्वत:चे तर्क लावण्यापेक्षा कामाकडे लक्ष द्यावे असे त्यांनी म्हटले होते. धर्मगुरुंच्या या विधानाला इरफानने ट्विटरवरुन उत्तर दिलेय. 


जे माझ्या विधानाने दुखी झालेत त्यांना आत्मचिंतन करायचे नाहीये अथवा त्यांना निष्कर्ष काढण्याची घाई आहे. माझ्यासाठी धर्म म्हणजे आत्मपरीक्षण. दया, ज्ञान आणि स्वनियंत्रण मिळवण्याचा धर्म हा स्त्रोत आहे, असे इरफान म्हणालाय.