मुंबई : शाहीद कपूरचे मीरा राजपूतशी लग्न झाल्यानंतर ही जोडी चांगलीच चर्चेत आहे. २०१५ मध्ये या दोघांनी लग्न केले. आता मीरा राजपूत पुन्हा एकदा चर्चेत आलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहीद आणि मीराच्या घरी लवकरच नवीन पाहुणा येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. नुकत्याच मुंबईत झालेल्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये मीराने रॅम्पवॉक केला. यात तीने ड्रेस घातला होता. 


हा फोटो मीराची मैत्रीण आणि डिझायनर मसबा गुप्ताने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या फोटोनंतर मीरा गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलेय.



 


मिसबाने हा फोटो शेअर करताना  “Two M’s and a Bum #sayheytobey – little M (sic).” असे म्हटलेय. दरम्यान, मीरा प्रेग्नंट असल्याचे वृत्त कितपत खरं आहे हे या फोटोवरुन तितकेसे स्पष्ट होत नाहीये कारण दोघांची नावे M अक्षरापासून सुरु होतात आणि दोघींचेही गेल्या वर्षी लग्न झाले.