मुंबई : बॉलीवूडच्या सिनेमांना सध्या ऑनलाइन लीकचे ग्रहण लागलेय. काही दिवसांपूर्वीच उडता पंजाबा हा सिनेमा प्रदर्शनापूर्वीच ऑनलाईन लीक झाला होता. त्यानंतर आता सलमानचा बहुप्रतिक्षित सुल्तान सिनेमा ऑनलाइन लीक झाल्याचे वृत्त आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज सलमानचा चित्रपट सुल्तान रिलीज झालाय. मात्र थिएटरमध्ये प्रदर्शित होण्याआधीच तो लीक झालाय. या वृत्ताला सायबर-क्राइम एक्सपर्ट दीपक शंकर यांनीही दुजोरा दिलाय. 


दरम्यान, सुल्तान ऑनलाईन लीक झाल्याचे वृत्त यशराज फिल्म्सने फेटाळून लावलंय. हल्ली चित्रपट पायरसीचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपूर्वी उडता पंजाब प्रदर्शनापूर्वी लीक झाला तरी या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर समाधानकारक यश मिळवता आले होते. त्यामुळे सुल्तान खरंच ऑनलाईन लीक झाला असल्यास त्याचा परिणाम बॉक्स ऑफिसवर कितपत होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.