मुंबई : झी मराठी वाहिनीवरील 'का रे दुरावा' ही मालिका एक्झीट घेत आहे. मात्र, यातील जय-आदिती जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. आता जय-आदितीची 'लव्हची स्टोरी' सुरु होतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जय म्हणजेट सुयश टिळक आणि आदिती म्हणजे सुरुची अडाकर. ही जोडी पुन्हा प्रेमात पडलीय. त्यांच्या या प्रेमाला कारण ठरेल 'स्ट्रॉबेरी'. 


'स्ट्रॉबेरी' या नव्या व्यावसायिक नाटकात ही जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. 'लव्हची स्टोरी' अशी टॅगलाइन असलेल्या या नाटकाबद्दल उत्सुकता आहे. छोट्या पडद्यावर काम करणारे अनेक कलाकार सध्या व्यावसायिक नाटकांमध्ये वळत आहेत. छोट्या पडद्यावरचं रोमँटिक कपल सुयश टिळक आणि सुरुची अडारकर यांचीही यात भर पडतेय.


प्रेमात पडलेल्या प्रत्येकासाठी आणि प्रेमात कधीही न पडलेल्यांना 'प्रेमात पडून बघावं' असा विचार करायला लावणारं हे नाटक असल्याचं निर्माता अभिजित साटम सांगतो. या नाटकातून आम्ही प्रेमाच्या तत्वज्ञानावर भाष्य करणार आहोत. प्रेमाचा एक वेगळा पैलू नाटकातून उलगडणार असून 'लव्हची स्टोरी' अशी या नाटकाची टॅगलाइन आहे. या नाटकाचे दिग्दर्शन अभिजित झुंजारराव केलेय. या नाटकात या दोघांशिवाय केतकी पालव आणि डॉ. निखिल राजेशिर्के हेही आहेत.