न्यूयॉर्क : हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर अॅनिस्टनची, पीपल मॅगझिनने २०१६ या वर्षातील सर्वात सुंदर महिला म्हणून निवड केली आहे.  जेनिफरचे पीपलच्या कव्हरपेजवर ४७ वर्षीय छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे, यावर जेनिफरने म्हटले आहे, "आपल्याला अत्यानंद झाला, या क्षणाला किशोरवयीन तरुणीसारख्या माझ्या भावना आहेत."
 
कारकिर्दीच्या सुरुवातीलाच जाडेपणा काम मिळण्यामध्ये आडवा येत असल्याचे एजंटने सांगितले. त्यानंतर मी स्वत:वर मेहनत घेतली. जेव्हा मी तंदुरुस्त असते तेव्हा मला आनंदी वाटते असे जेनिफरने पीपल्स मॅगझिनशी बोलताना सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आत्मविश्वास, समाधान, दयाळूपणा, प्रामाणिकपणा, चांगलेपणाने आयुष्य जगणे ही आपल्यासाठी सौदर्याची व्याख्या असल्याचे जेनिफरने सांगितले. आव्हाने स्वीकारा आणि एखादी गोष्ट मनासारखी घडली नाही तर, खेद वाटून घेऊ नका असे जेनिफरने सांगितले. 


अमेरिकन टेलिव्हीजनवरील 'फ्रेंडस' या शो मधील राचेल हे तिचे पात्र गाजले. या शो मधील भूमिकेमुळे जेनिफरला नाव, प्रसिद्धी मिळाली.