मुंबई : मराठी सिनेसृष्टीत मैलाचा दगड ठरलेल्या नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या सिनेमाचा हिंदी रिमेक बनवला जाणार आहे. या रिमेकची निर्माती करण जोहर करणार असल्याचे बोलले जातेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सैराटच्या हिंदी रिमेकमध्ये आर्चीची भूमिका श्रीदेवीची मुलगी जान्हवी करणार असल्याची चर्चा आहे. सैराटमध्ये रिंकू राजगुरुने आर्चीची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. 


त्यामुळे आर्चीची भूमिका कोण साकारणार याबाबत चर्चा सुरु होती. जान्हवी ही भूमिका साकारणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान, बोनी कपूर यांनी जान्हवी करण जोहरच्या सिनेमातून पदार्पण करेल असं जाहीर केलंय. त्यामुळे आर्चीची भूमिका कोणाच्या पदरात पडतेय हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.