नवी दिल्ली : ग्रॅमी अॅवॉर्ड विजेता कॅनडाचा पॉप गायक जस्टिन बीबर बुधवारी सकाळी मोठ्या सुरक्षेच्या ताफ्यात भारतात दाखल झालाय. भारतात होणारा हा त्याचा पहिला संगीत कार्यक्रम मुंबईत होणार आहे. हा कार्यक्रम म्हणजे त्याचा 'पर्पज वर्ल्ड टूर'चा एक भाग आहे.


'सलमानचा सुरक्षारक्षक शेरा'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता सलमान खानचा अंगरक्षक म्हणून ओळखला जाणाऱ्या शेराच्या नेतृत्वाखाली मोठ्या सुरक्षेत बीबर मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बाहेर पडला. आपल्या टीमसोबत एका चार्टर्ड विमानानं तो इथं दाखल झालाय. यावेळी त्यानं गुलाबी रंगाचा पुलोव्हर आणि काळ्या रंगाची शॉटस् परिधान केली होती. इथून त्याला दक्षिण मुंबईतल्या सेंट रेजिस हॉटेलमध्ये नेण्यात आलं. 


'व्हाईट फॉक्स इंडिया'च्या टूर आयोजकांच्या माहितीनुसार, कार्यक्रमाचे जवळपास ४५,००० सीटस् बुक झालेले आहेत. दुपारी ३ वाजल्यापासून प्रेक्षकांना एन्ट्री मिळेल. रात्री ८ वाजता बीबर कार्यक्रमासाठी कार्यक्रमस्थळी दाखल होईल. कार्यक्रम स्थळावर पोलीस ड्रोनच्या साहाय्यानं देखरेख ठेवून आहेत. यासाठी जवळपास ५०० पोलीस कर्मचारी आणि २५ अधिकाऱ्यांना तैनात करण्यात आलंय.


जस्टीन बीबर भारतात दाखल

सोन्या-चांदीच्या ताटात जेवण


जस्टिन पहिल्यांदाच भारतात दाखल झालाय. यामुळे त्याच्या या दौऱ्यादरम्यान त्याच्या जेवणाची, आरामाची आणि एन्टरटेन्मेंटची खास काळजी घेतली जाणार आहे. जेवणात रॅच सॉस, फळं, ऑर्गेनिक केळी आणि बिया नसलेली द्राक्षं दिली जाणार आहेत.


पहिल्या दिवशी राजस्थानहून आलेले शाही खानसामे महाराजांना पसंत असलेले खाद्यपदार्थांची रेलचेल असेल याकडे लक्ष देतील. हे जेवण सोनं आणि चांदीच्या ताटांत वाढण्यात येईल. या ताटांवरही जस्टिन आणि त्यांच्या टीम सदस्यांची नावं हिंदी भाषेत कोरण्यात आलीत.


२९ राज्यांची चव


बीबरला भारताच्या २९ राज्यांचं प्रतिनिधित्व करणारे खाद्यपदार्थ वाढण्यात येतील. आपल्या इंडिया टूर दरम्यान बीबर मुंबईतल्या काही प्रसिद्ध ठिकाणी फेरफटका मारण्यासाठीही जाणार आहे. 


हेलिकॉफ्टर, सेडान कार, वोल्वो बसचा ताफा


बीबरच्या ताफ्यात १० शानदार सेडान कार, दोन वोल्वो बस आहेत. त्याच्यासाठी खास रॉल्स रॉयस कार आरक्षित करण्यात आलीय. हेलिकॉफ्टरनं तो आपल्या कार्यक्रमस्थळी दाखल होणार आहे.


भव्य कॉन्सर्ट


मुंबईत होणारी बीबरची ही कॉन्सर्ट आत्तापर्यंतची भारतातली सर्वात मोठी आणि महागडी कॉन्सर्ट मानली जातेय. या कॉन्सर्टची मजा लुटण्यासाठी येणाऱ्या फॅन्सना पार्किंगसाठी स्टेडियमजवळ चार वेगवेगळ्या ग्राऊंडसमध्ये पार्किंगव्यवस्था करण्यात आलीय. याशिवाय स्टेडियम पोहण्यासाठी ४-५ स्पेशल बसची व्यवस्थाही करण्यात आलीय.