चला हवा येऊ द्याच्या सेटवर काहे दिया परदेसची धमाल
झी मराठी वाहिनीवर नव्याने सुरु झालेल्या काहे दिया परदेस मालिकेची टीम चला हवा येऊ द्याच्या सेटवर आली होती.
मुंबई : झी मराठी वाहिनीवर नव्याने सुरु झालेल्या काहे दिया परदेस मालिकेची टीम चला हवा येऊ द्याच्या सेटवर आली होती.
यावेळी या मालिकेतील कलाकारांनी सेटवर एकच धमाल उडवून दिली. काहे दिया परदेसमधील शिव-गौरीच्या जोडीने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकून घेतल्याने या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळतोय.
चला हवा येऊ द्याच्या सेटवर शिव आणि गौरीने सैराटच्या गाण्यावर डान्स केला. तसेच झिंगाट गाण्यावर मालिकेतील सर्वच कलाकार सैराट नाचले. चला हवा येऊ द्यामध्ये आज हा एपिसोड प्रसारित केला जाणार आहे.