मुंबई : सध्या सोशल मीडियावर बॉलीवूड अभिनेत्री काजोल आणि अजय देवगण यांची मुलगी निसा हिचा फोटो व्हायरल होतोय. गेल्या अनेक दिवसांपासून अमिताभ बच्चन यांची नात  नव्या आणि शाहरुखचा मुलगा आर्यन खान यांच्या फोटोजवरुन चर्चा सुरु होती. नव्या आणि आर्यनचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतर आता काजोलच्या मुलीचीही चर्चा सुरु झालीये. काजोलची मुलगीही बॉलीवूडमध्ये येणार का असा सवाल केला जातोय. काजोलने नुकताच मुलीसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय.


त्यानंतर तिच्या बॉलीवूड प्रवेशाबाबतच्या चर्चांना उधाण आलेय. सध्या बीटाऊनमध्ये बॉलीवूड कलाकारांची मुले चांगलंच बस्तान बसवतायत. यातील निवडक म्हणजे टायगर श्रॉफ, श्रद्धा कपूर, आलिया भट्ट, वरुण धवन ही नावे घेता येतील. यात आता निसाचा समावेश होणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.