नवी दिल्ली : हृतिक रोशन वाद सुरु झाल्यानंतर कधीही या वादावर उघडपणे न बोलणाऱ्या अभिनेत्री कंगना रानौत हिनं अखेर आपलं मौन सोडलंय. 


'यासाठी तयार नव्हते'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या वादासाठी मी तयार नव्हते. मला सायकोपॅथ म्हटलं गेलं... रक्तपिसासून म्हटलं गेलं... अशी विशेषण माझ्यासाठी वापरली जावीत, यासाठी मी तयार नव्हते... असं कंगनानं म्हटलंय. 


कंगनाचा एक्स बॉयफ्रेंड अध्ययन सुमन यानं कंगना काळी जादू करत असल्याचा दावा केला होता. शिवाय, कंगनानं आपल्याला मारहाण केल्याचंही अध्ययननं म्हटलं होतं. 


उल्लेखनीय म्हणजे, या वादावर कंगनानं भाष्य केलं मात्र कुणाचंही नाव न घेता... अनेक व्यक्तींसाठी तुमच्या मनात इनसिक्युअर भावना असू शकतात... पण, कुणाबद्दल तुम्ही क्रूर असू शकत नाही. बऱ्याच नाजूक गोष्टी तुम्ही सार्वजनिक करू शकत नाहीत.


नकारार्थी विशेषणांबद्दल


- जेव्हा लोक मला सायकोपॅथ म्हणतात, तेव्हा मी त्याची पर्वा करत नाही. या देशात महिलांना Witch, witch, Hor, Psychopathy (हडळ, वेश्या, वेडी) म्हटलं जातं... पण हे आता फारच जुनं झालंय. 


काळ्या जादूच्या आरोपांबद्दल... 


मला इतकंच म्हणायचंय की मी एक अभिमानी हिंदू आहे. माझी पर्सनॅलिटी स्वामी विवेकानंद यांच्या शिकवणीवर आणि सनातन धर्मावर आधारित आहे. जर माध्या धार्मिक मान्यता तुम्ही विचित्र पद्धतीनं समोर मांडाल तर हे योग्य नाही. हॅरी पॉटरचे सिनेमे तुम्हाला आवडत नाहीत का? 


आपल्यावर होणाऱ्या टीकेवर उत्तर देताना, जर कुणी बायपोलर डिसऑर्डरशी लढतोय तर तुम्ही त्याला अयोग्य ठरवून समाजातून वेगळं काढाल? मासिक पाळीसारख्या गोष्टींची तुम्हाला लाज का वाटवी? असाही प्रश्न कंगनानं विचारलाय. 


राष्ट्रीय पुरस्कारांची हॅट्रीक


दरम्यान, आज कंगनाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कारासहीत राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये कंगनानं हॅट्रीक मारलीय. 'फॅशन', 'क्वीन'नंतर तनु वेडस् मनु रिटर्न करिअरमधला तिसरा राष्ट्रीय पुरस्कार पटकावलाय. 


माझं यश हेच टीकाकारांना माझं उत्तर असेल... असंही कंगनानं मुलाखतीदरम्यान म्हटलंय.