`बिग बॉस` विजेत्याचा आत्महत्येचा प्रयत्न
कन्नड बिग बॉस ४चा विजेता प्रथम याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आलीये.
नवी दिल्ली : कन्नड बिग बॉस ४चा विजेता प्रथम याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आलीये.
फेसबुकवर त्याने याबाबतचा लाईव्ह व्हिडीओही केला होता. झोपेच्या गोळ्या घेत त्याने आपले जीवन संपवत असल्याचे फेसबुकवरुन जाहीर केले.
दरम्यान, त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याच समजताच त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. पर्सनल आणि प्रोफेशन लाईफबद्दल सुरु असलेल्या अफवांमुळे त्याने इतके मोठे पाऊल उचलल्याचे कळतेय.