मुंबई : सुनील ग्रोवरसोबत वाद झाल्यानंतर एक-एक करत सगळे सहकारी कपिलची साथ सोडून जातांना दिसत आहे. यामुळे कपिल शर्मा शोच्या टीआरपी सतत घसरतांना दिसत आहे. कपिल शर्माचे वाईट दिवस सुरु होताच त्याच्या एक्स गर्लफ्रेंडने देखील त्याच्याशी बदला घेण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कपिलची एक्स गर्लफ्रेंड प्रीती सिमोजने सुनील ग्रोवरसोबत एक नवा शो प्लान केला आहे. सुनील ग्रोवर एका वेगळ्या कॉन्सेप्टवर नवा टीव्ही शो प्लान करतांना दिसत आहे. 


सुनीलने त्याचा शो सोनी टीवीला सबमिट केला आहे. सोनी टीवीने या टीव्ही शोला मंजुरी देखील दिली आहे. कपिल पेक्षा त्याचा वेगळा वेळ सुद्धा मिळाला आहे. जूनपासून कपिलच्या शो सोबत सुनील ग्रोवरचा हा शो येऊ शकतो.


चॅनेलने कपिलला एका महिन्याचा अल्टीमेटम दिला आहे. त्यामुळे कपिल शर्मा शो सोनी टीव्ही वरुन गुंडाळला जाऊ शकतो. तसंही कपिल शर्मा त्याच्या आगामी फिरंगी सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त होणार आहे.


जेव्हा सुनील ग्रोवरच्या नव्या शोबाबत प्रीती सिमोजला विचारण्यात आलं तेव्हा तिने म्हटलं की, मी अशा कोणत्याही गोष्टीचा भाग नाही आहे. पण मी कपिलचा शो सोडला आहे. सुनील ग्रोवरसोबत वाद झाल्यानंतर कपिल शर्मा शोचा सेट रिकामा दिसत आहे. चंदन प्रभाकर, अली असगर आणि सुगंधा मिश्राने यांनी देखील शोवर बायकॉट केला आहे.