मुंबई : कपिल शर्माने जॅकलीन फर्नांडीजसोबत लग्न केलं आणि तिच्या आईने आशिर्वाद देखील दिले. हे सगळं तेव्हा झालं जेव्हा 'द कपिल शर्मा शो'च्या सेटवर जॅकलीन टायगर श्रॉफसोबत तिच्या आगामी सिनेमा 'अ फ्लाइंग जट'च्या प्रमोशनसाठी आली होती. या दरम्यान सिनेमा आणि शोच्या टीमने भरपूर मज्जा केली. कपिल आणि जॅकलीनच्या विवाह देखील एक मज्जेचा विषय ठरला.


कपिलच्या शोमध्ये टायगर आणि जॅकलीनशिवाय सिनेमा 'अ फ्लाइंग जट'चे डायरेक्टर रेमो डिसूजा त्याची पत्नी लिजेल डिसूजासोबत पोहोचला. शूटिंगदरम्यान सुनील ग्रोवर सगळ्यांना पोटभरुन हसवलं.