सोनी टीव्हीपूर्वी झी टीव्हीवर दिसला कपिल शर्मा
`इंडियाज बेस्ट ड्रामेबाज` या झी टीव्हीवरील बच्चे कंपनीच्या कार्यक्रमाच्या ग्रँड फिनालेला सुप्रसिद्ध कॉमेडीयन कपिल शर्मा याने हजेरी लावून प्रेक्षकांना खळखळू हसवलं आणि मने जिंकली.
मुंबई : 'इंडियाज बेस्ट ड्रामेबाज' या झी टीव्हीवरील बच्चे कंपनीच्या कार्यक्रमाच्या ग्रँड फिनालेला सुप्रसिद्ध कॉमेडीयन कपिल शर्मा याने हजेरी लावून प्रेक्षकांना खळखळू हसवलं आणि मने जिंकली.
कपिल शर्मा आपल्या कार्यक्रमाच्या प्रमोशनसाठी झी टीव्हीवरील या कार्यक्रमात दिसला होता. याबद्दल त्याला विचारले असता तो म्हटला. जो क्रमांक एकचा शो असतो त्यात मी असतो. त्यामुळे झी टीव्हीवरील नंबर एक शो 'इंडियाज बेस्ट ड्रामेबाज' असून त्यात मी आलो आहे, असे कपिलने यावेळी सांगितले.
कपिल शर्माला यावेळी साजिद खानने बच्चे कंपनीच्या पालकांशी भेट करून दिली. त्यावेळी आपल्या खास स्टाइलमध्ये कपिलने त्या सर्वांची खिल्ली उडवली.
पाहा कपिलचा हा खास अंदाज...