मुंबई: कॉमेडीचा बादशाह कपिल शर्मा आता सोनी या चॅनलवर नवा शो घेऊन येत आहे. आपल्या या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सहभागी व्हावं, अशी इच्छा कपिलनं व्यक्त केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नरेंद्र मोदी माझ्या कार्यक्रमाममध्ये आले तर मला खूप आनंद होईल, या कार्यक्रमामध्ये मी कलाकारांबरोबरच राजकारण्यांनाही आमंत्रित करणार आहे, असं कपिल म्हणाला आहे. 


मोदी कार्यक्रमाला आले तर मी त्यांना राजकारण आणि त्यांच्या पक्षाबद्दल काहीच विचारणार नाही, पण एका छोट्या गावातून आलेली व्यक्ती देशाचा पंतप्रधान कशी होभ शकते, याबाबत त्यांना विचारीन असं वक्तव्य कपिलनं केलं आहे.