नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिनं सिने निर्माता - दिग्दर्शक करण जोहर याच्यावर गंभीर आरोप केलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'ए दिल है मुश्किल'च्या शुटिंग दरम्यान करण जोहर आपल्याला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करत होता, असं अनुष्कानं म्हटलंय. 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमात बोलताना हसत खेळत अनुष्कानं हा खुलासा केलाय. याच कारणानं आपण करण विरोधात पोलिसांत लैंगिक छळाची तक्रार दाखल करण्यासाठी जाणार होतो, असंही अनुष्कानं यावेळी म्हटलंय. 


इतकंच नाही तर, मनीष मल्होत्राच्या पार्टीत करणनं अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिच्यासोबतही छेडछाड केल्याचा आरोप या कार्यक्रमा दरम्यान अनुष्कानं केलाय.


जेव्हा हा मुद्दा वाढला तेव्हा या कार्यक्रमात कतरिना कैफ हिनं हस्तक्षेप केला... कतरिनानं मात्र यावेळी करण जोहरची बाजू लावून धरली... कदाचित अनुष्काला असं वाटलं असेल, असं कतरिनानं म्हटलं.... आपण ही चर्चा दुसऱ्या दिवसासाठी ठेवू असं म्हणत कतरिनानं या मुद्द्यावर आणखी चर्चा टाळली. 


महत्त्वाचं म्हणजे, करण जोहर दिग्दर्शित 'ए दिल है मुश्किल' या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर चांगलाच जम बसवला होता. या सिनेमात अनुष्का शर्मा हिनं रणबीर कपूर आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्यासोबत काम केलंय.