मुंबई : अभिनेत्री करिना कपूर गरोदर असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध होत होत्या. या सगळ्या चर्चांवर अखेर करिना कपूरनंच मौन सोडलं आहे. मी एक महिला आहे, मलाही आई व्हायचं आहे, पण याविषयी आता माझ्याकडे सांगण्यासारखं काहीच नाही, असं करिना म्हणाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या बातम्या ऐकल्यावर मी पाच मुलांची आई आहे आणि या मुलांना मी लंडनमध्ये लपवून ठेवलं आहे, असा टोमणाही करिनानं मारला आहे.


करिना नवरा सैफ अली खानबरोबर लंडनला सुट्टीसाठी गेली होती. तेव्हापासूनच करिना गरोदर असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत होत्या. सैफ आणि करिना यांचं 2014 मध्ये लग्न झालं आहे.