मुंबई : अभिनेत्री करिना कपूर-खान अर्थात 'बेबो'  प्रेग्नेंसीच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. तिने याबाबत नाराजीही व्यक्त केली होती. माझ्यापासून थोडेच लपून राहणार आहे,  एक दिवस समजेलच, असे सांगत नाराजी व्यक्त केली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करीनाकडे गुड न्यूज असल्याची माहिती कन्फर्म झाली आहे. करीनाचा पती आणि अभिनेता सैफ अली खानने आपण 'बाबा' बनणार गोड बातमी दिलेय. याबाबत टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.


डिसेंबर महिन्यात आम्हाला बाळ होणार असल्याचे सैफने स्पष्ट केलेय. चाहत्यांच्या आशिर्वादासाठी आम्ही आभारी आहोत तसेच मीडियाने आमच्या खासगी आयुष्यात छवळाढवळ न करता पेशन्स दाखवल्याबद्दलही आम्ही आभारी आहोत, असेही सैफने म्हटले आहे.
 
करीनाचे वडील अभिनेते रणधीर कपूर यांनी देखील मला लवकरच आजोबा बनायचं आहे असे विधान केले होते. या सगळ्यामुळे करिना-सैफच्या घरात लवकरच पाळणा हलणार असणार असल्याचे म्हटले जात होते. आज यावर सैफने शिक्कामोर्तब केले आहे.