मुंबई :  लॅक्मे फॅशन वीक म्हटलं की फॅशन जगताची तिथे हजेरी असणारच शिवाय बॉलिवूडचे मोठमोठाले तारे तारकाही रॅम्पवर उतरतात.. प्रत्येक लॅक्मे फॅशन वीकचं काही ना काही वैशिष्ट्य असतं. यावेळच्या लॅक्मे फॅशन वीकचं वैशिष्ट्य होतं करिना कपूर. नाव सांगताच तुम्हाला कळलंच असेल. करिना बेबी बम्पसह रॅम्पवर उतरली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सब्यासाचीसाठी तिनं रॅम्पवॉक केला. सिल्व्हर कलरच्या ब्रायडल विअरसह करिना रॅम्पवर उतरली आणि सर्वांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या. कपूर खानदानातले रणवीर, करिष्माही रॅम्पवर दिसले. रॅम्पवॉकचा हा क्षण अविस्मरणीय होता असे करिनाने यावेळी सांगितले. तसेच 


करिना करिष्मा आणि रणबीर शो स्टॉपर होते. तर सिरियल किसर इम्रान हाश्मीने त्याचा मुलगा अयानसह रॅम्पवॉक केला. शिल्पा शेट्टी, बिपाशा बासू, राधिका आपटे, पूजा हेगडे दिया मिर्झा प्राची देसाई, सोफिया चौधरीनंही रॅम्प वॉक केला.