मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांनी नुकतंच आपल्याला बाळाची चाहूल लागल्याचं जाहीर केलंय. पण, आता मात्र ही जोडी वादात अडकलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करीना आणि सैफनं गर्भलिंग चाचणी केल्याचं म्हटलं जातंय. येत्या डिसेंबर महिन्यात सैफिनाचं पहिलं बाळ या जगात आपलं पहिलं पाऊल टाकणार आहे. पण, त्याआधीच करीना-सैफला आपलं हे बाळ मुलगा असेल की मुलगी हेही माहीत पडलंय. 


हे जोडपं सध्या लंडनमध्ये सुट्टीच्या निमित्तानं गेलंय. तिथंच करीना - सैफनं आपल्या बाळाचं लिंगही जाणून घेतलंय. 


आपल्याला होणारं बाळ हा एक मुलगा असणार आहे, हेही आता त्यांना माहीत झाल्याचं म्हटलं जातंय. 


बाळाला जन्म देण्याअगोदरच करीनाला आपल्या 'विरे दी वेडिंग' या सिनेमाचं शुटींग पूर्ण करायचंय... सैफही सध्या विशाल भारद्वाज यांच्या 'रंगून' या चित्रपटासाठी व्यस्त आहे.