मुंबई : बॉलीवुड अभिनेत्री करीना कपूरने तिचा मुलासोबतचा एक फोटो सोशल अकाऊंटवर शेअर केलाय. करिनाने आपला लाडला पुत्र तैमूरसोबतचा हा फोटो सोशल मीडियावर टाकताच करिनाचं अनेकांनी कौतुक केलंय.  करिना आपल्या बिझी शेड्यूलमधून आपल्या लहानग्यालाही आपला खास वेळ देत आहे.


करिनाने प्रेग्नन्सीआधीही स्वतःला कामात बिझी ठेवत आपला रोजचा दिनक्रम सुरूच ठेवला होता. आता तैमूरच्या जन्मानंतरही करिना पुन्हा एकदा कामाला लागली आहे. मात्र कामातून वेळ काढत ती आपल्या लाडक्या मुलासह वेळ घालवताना दिसत आहे.