मुंबई : करीना कपूर खान आणि सैफ अली खान या जोडप्याला आता बॉलीवूडमधील बेस्ट कपल्सपैकी एक म्हटले जाते. मात्र यांच्या लग्नाचा निर्णय़ सुरुवातीला करीनाची बहिण करिश्मा आणि आई बबिता शिवदासानीला मान्य नव्हता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या रिपोर्टनुसार, करिनाने जेव्हा सैफसोबत लग्नाचा निर्णय घेतला तेव्हा तो आमच्या कुटुंबासाठी तितकाच शॉकिंग होता. मात्र नंतर आम्ही तो निर्णय मान्य केला. कारण तो निर्णय़ बेबोचा होता. तिच्यासाठी काय चांगले आहे हे तिला कळायचे. त्यामुळेच तिच्या निर्णय़ाला अधिक विरोध केला नाही. ती स्वत:साठी योग्य तो निर्णय़ घेईल याची खात्री होती, असे करिश्मा म्हणाली. 


 २०१२मध्ये सैफ आणि करीना यांनी लग्न केले. त्यापूर्वी ५ वर्षे ते रिलेशनशिपमध्ये होते. २००९मध्ये सैफने करीनासोबतचे संबंध जाहीर केले. त्यानंतर १२ ऑक्टोबर २०१२मध्ये ते दोघे विवाहबद्ध झाले.