मुंबई : रणबीर कपूरशी ब्रेक अपनंतर कतरिना कैफ आता पुन्हा आपल्या प्रोफेशनल करिअरवर लक्ष केंद्रीत करतेय. यामुळेच की काय सध्या ती अनेक फिल्मी पार्ट्यांमध्येही दिसतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांपासून ती करण जोहरच्याही संपर्कात आहे. करणनं नुकताच कतरिनाला एका सिनेमाची ऑफर दिली होती. पण, हा सिनेमा कतरिनानं नाकारल्याचं समजतंय. यामागचं कारणही तिनं कळवलंय. हा सिनेमा तरुण मनसुखानी दिग्दर्शित करणार आहे. 


स्क्रिप्ट ऐकण्यासाठी वेळ ठरली... कतरिनाला स्क्रिप्ट ऐकवण्यात आली. परंतु, कतरिनानं हा सिनेमा नाकारला. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, कतरिनाला जेव्हा या सिनेमाचा हिरो कोण हे कळलं तेव्हा तिनं हा चित्रपट न करण्याचा निर्णय घेतला. 


कोण आहे हा अभिनेता?


या सिनेमासाठी कतरिनासोबत अभिनेता सुशांत सिंह राजपूर याचं नाव घेण्यात आलं होतं. हे नाव ऐकल्यानंतर कतरिनानं सिनेमा नाकारला, असं म्हटलं जातंय. सुशांत सिंह राजपूत याचं नाव अजून मोठा स्टार म्हणून घेतलं जातं नाही. त्यामुळे, आपलं करिअर धोक्यात टाकण्याची कतरिनाची इच्छा नाही. आदित्य रॉय कपूर सोबत आपटलेला 'फितूर' अजूनही कतरिनाच्या डोक्यातून गेलेला नाही. 


मात्र, असं सरळ न सांगता सिनेमात अभिनेत्रीला काही फारसा वाव नसल्याचं सांगत कतरिनाननं हा सिनेमा नाकारलाय.