मुंबई : सध्या अभिनय आणि गायन स्वत:च करण्याची क्रेझ बॉलीवूड व मराठी इंडस्ट्रीमध्ये दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता मराठमोळ्या केतकी माटेगावकर हिने याही पुढे एक पाऊल टाकत आता गायिका, अभिनेत्रीसोबतच संगीतकाराचा शिक्कादेखील आपल्या नावावर करून घेतला आहे. 


केतकीचा लवकरच एक नवीन व्हिडीओ अल्बम प्रदर्शित होणार आहे. या व्हिडीओमध्ये सुरेश वाडकर यांच्या सुरेल आवाजाला केतकी माटेगावकर संगीतबद्ध करणार आहे. हा व्हिडीओ अभंगांचा असेल.