मुंबई : करिना कपूर आणि अर्जुन कपूर यांचा 'की अॅन्ड का' हा सिनेमा प्रदर्शित होऊन ३ दिवस झाले आहेत. सिनेमाच्या थीमला प्रेक्षकांनी अधिक पसंती दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

की अँड का सध्या चांगली कामगिरी करतोय. शनिवारी या सिनेमाने ८.४१ कोटी तर रविवारी ९.५२ कोटी रुपये कमावले. पहिल्या तीन दिवसात सिनेमाने एकूण २५.२३ कोटींची कमाई केली आहे. २०१६ या वर्षातल्या सिनेमांपैकी 'की अँड का'ची कमाई ही सर्वाधिक आहे. 


सिनेमामध्ये अर्जुन कपूरने हाउस हसबंड आणि करीना कपूर ख़ानने वर्किंग वाइफची भूमिका साकारली आहे. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे दोघेही या सिनेमात पाहुण्यांच्या भूमिकेत आहेत.